My Blog List

Tuesday, July 6, 2010

"पाउस"
येथे माणुसकीच्या गाडीला ब्रेक लागलाय,
वादाच्या भोवर्यात येथील समाज अडकलाय.
अवनति पंकात माणुस घोरत पडला आहे,
दू:खनिद्रेने तो कमजोर ज़ाला आहे.
माणुसकीच ख़त घालून इथे पीक उगवल जातं,
अद्न्यांतिमिरात माणसाचं आयुष्य ज़िजत, खंगत राहतं.
लोक येथील वाहताहेत निराशेचा अवजड पहाड़,
देवा, आता ह्या देशात तूच आशेचा पाउस पाड़ !!!
तुज्या कृपेच्या वर्षावाने हा देश नक्कीच जागेल,
आनंद आणि एकजुटिच निशान जगभर मिरवेल!
ह्यांच्या दू:खाचा परिघ वाढतोय सताड,
म्हणुनच - "देवा ह्या देशात पाउस पाड़!!!"
- सुधांशु