माणसाच्या जीवनात आणखी एक काळा प्रसंग घडला,
माणूसच माणसाचा जीव घेण्यामागे पडला!
मुंबापुरीची 'दहशत' बघून तर आज तो पण रडला,
लोक मात्र म्हणाले, आज पाऊस फार पडला!
पाऊस कितीही पडला तरी माणुसकीचा दुष्काळ आहे,
ओलावा केव्हाच सरला कारण अमानवी प्रव्रुत्तीचा सुकाळ आहे!
धर्म, जात, पंथ ह्यांच्या उंचीपुढे हिमालयही आज छोटाच आहे,
आपुलकी, प्रेम केवळ नावापुरते, पैसा फक्त मोठा आहे!
अमानुष विचारांच्या वादळाने शांततेच्या मुर्तीला काळा रंग फासलाय,
काय हाच दिवस बघण्यासाठी आपल्या पुर्वजांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिलाय?
काळोखाच्या ढगांखाली निर्दयी वारा वाहतोय सोसाट,
नकोय आता पाऊस देवा, हवीय नवी पहाट,
हवीय नवी पहाट!
No comments:
Post a Comment